Beed News :शौचालय मध्ये ठेवलेला भाजीपाला विक्रीसाठी पहा पूर्ण बातमी ,तुमच्या घरी कोणता भाजीपाला ?

Beed News :ब्रेकिंग न्यूज : बीडच्या भाजीमंडई मधील धक्कादायक अन् संतापजनक प्रकार…

Beed News Today: सामान्य जनते सामोर प्रश्न उभा आहे ,आपल्या किचनमध्ये  शौचालयात ठेवलेला भाजीपाला तर नाही ना ? असं म्हणण्याची संतापजनक आणि धक्कादायक बातमी बीडमधून समोर आली आहे. बीड शहरातील भाजी मंडईत असणाऱ्या महिला शौचालयात, भाजीमंडईत दिवसा विक्री केला जात असणारा भाजीपाला ठेवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Beed News :शौचालय मध्ये ठेवलेला भाजीपाला विक्रीसाठी पहा पूर्ण बातमी ,तुमच्या घरी कोणता भाजीपाला ?

Beed News :बीडमधील भाजी मंडीमध्ये सर्रास विक्री होत असलेला शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपली दुकान थाटून बसतात. दिवसभर भाजीपाला विकला जातो आणि रात्री दहा साडेदहा नंतर उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवण्यात येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येतो.या प्रकारामुळे बीड मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे कि आपण तर हा भाजीपाला खात नसेल न ?

बीड नगरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलं आहे. मात्र या शौचालयाचा रात्रीच्या वेळी हा भाजीपाला विक्रेता जणूकाही कोल्ड स्टोरेज म्हणून या वापर करतोय की काय ? असं वाटू प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वात महत्वाचे  म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Beed News :दरम्यान, या घटनेने बीड (Beed) शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामान्य जनते समोर असे खुप प्रश्न उभे आहेत जे कि आपण जे अन्न खातो त्यासाठी लागणारे भाजीपाला व फळे इ. हे कसे पिकवले जातात व त्यासाठी कशी साठवणूक पद्धती वापरली जाते ,Beed News हे जाणून घेण खूप महत्वाचे आहे . Beed News :शौचालय मध्ये ठेवलेला भाजीपाला विक्रीसाठी पहा पूर्ण बातमी ,तुमच्या घरी कोणता भाजीपाला ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *