Modi Aawas Yojana: ओबीसींसाठी तब्बल १२ हजार कोटींची ‘मोदी आवास योजना’ यांना होणार लाभ.

Modi Aawas Yojana

Modi Aawas Yojana: ओबीसी साठी तब्बल १२ हजार कोटींची ‘मोदी आवास योजना’

Modi Aawas Yojana
Modi Aawas Yojana

राज्यातील इतर मागासवर्गीय साठी हि योजना खुप महत्वाची ठरणार आहे. हि योजना लवकरात लवकर सुरु होईल.

मुंबई : महाराष्ट्र राज्यतील  इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) येत्या तीन वर्षांत 12 हजार कोटी रुपये खर्चून मोदी आवास
योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. लिंगायत, गुरव, वडार
आणि रामोशी समाजासाठी स्वतंत्र चार महामंडळे स्थापन करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात
आलेModi Aawas Yojana
महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींसाठी घरकूल योजना व लहान समाजघटकांसाठी महामंडळांची
घोषणा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी त्यानुसार
अहवाल सादर केला. योगायोग म्हणजे आता ओबीसी व गृहनिर्माण ही दोन्ही खाती सावे यांच्याकडेच
असल्याने योजनेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.महाराष्ट्र राज्यातील  ओबीसी महामंडळांतर्गत दोन उपकंपन्या : महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ – वीरशैव लिंगायत
समाजासाठी. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ – गुरव समाजासाठी.
किती घरे? कसा मिळेल लाभ?
मोदी आवास योजनेंतर्गत २०२६ पर्यंत ओबीसींसाठी १० लाख घरे बांधण्याचे संकल्प या योजने अंतर्गत घेण्यात आला आहे. स्वत:चे किंवा कुटुंबाचे मालकीचे राज्यात पक्के घर नसणाऱ्यांना आणि महाराष्ट्रात किमान १५ वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्यांना या
योजनेचा फायदा मिळेल. पात्र व्यक्तीस १ लाख २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *